29.2 C
New York
Friday, June 5, 2026

Buy now

आ.श्वेता महाले यांच्या प्रयत्नांमुळे ११५ वर्षांनंतर जालना-खामगाव रेल्वेमार्गाला हिरवी झेंडी!

मोदींचा विश्वास, फडणवीसांची साथ, रेल्वे लोक आंदोलनसमिती चा लढा आणि...रुळावर आले स्वप्न! आ.श्वेता महाले यांच्या प्रयत्नांमुळे ११५ वर्षांनंतर जालना-खामगाव रेल्वेमार्गाला हिरवी झेंडी! विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेचे...
spot_img

टाटाची ‘ही’ कार निघाली सुसाट ! 1 लाखाहून जास्त युनिट्सच्या विक्रीसहित अव्वल स्थानी कायम

ध्या भारतीय बाजारपेठेत एसयूव्ही सेगमेंटच्या कार मॉडेल्सची मागणी मोठ्या प्रमाणत वाढत आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या सहा महिन्यांचा विचार केल्यास म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत टाटा पंच( Tata Punch) ही सर्वाधिक विक्री होणारी SUV ठरली आहे.

टाटा पंचने या सहामहिन्याच्या कालावधी दरम्यान तब्बल 1,01,120 युनिट्सची विक्री केली आहे. या विक्रीमुळे कारच्या वार्षिक विक्रीत 40.19 टक्क्यांची वाढ झाली आहे. टाटा पंचंची मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 72,626 युनिट्सची होती. त्यामुळे या कारने मोठी झेप घेतली असून भारतीय ग्राहकांच्या मनात घर केले आहे.

एसयुव्ही सेगमेंटमध्ये Hyundai Creta ही कार विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे, 15.20 टक्के वार्षिक वाढीसह 96,416 युनिट्सची विक्री झाली आहे. तर, मारुती सुझुकी ब्रेझा ही कार तिसऱ्या स्थानावर असून या कारच्या 93,659 युनिट्सची विक्री झाली आहे. ब्रेझाची वार्षिक वाढ 14.31 टक्के होती.

चौथे आणि पाचवे स्थान

महिंद्रा स्कॉर्पिओ ही चौथ्या स्थानावर असून या कारचे 81,293 युनिट्स विक्री झाले आहे. त्यामुळे स्कॉर्पिओच्या विक्रीत 35.83 टक्के वार्षिक वाढ झाली आहे.

एप्रिल ते सप्टेंबर 2024 च्या एसयुव्ही कार विक्रीचा आढावा घेतला तर असे दिसते की टाटा पंचने जबरदस्त विक्री वाढ नोंदवली आहे. तर इतर कंपन्यांच्या कार्सनेही विक्रीत वाढ नोंदवली आहे मात्र काही वाहनांच्या विक्रीत काही प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या