10.6 C
New York
Saturday, March 21, 2026

Buy now

दयासागरजी महाले सांस्कृतिक सभागृहावरून राहुल बोंद्रेंचा ‘रेटून खोटे बोल’ महोत्सव…भाग 2

खोट्या आरोपांची फॅक्टरी आणी पुराव्यांची अ‍ॅलर्जी : राहुल बोन्द्रे.. भाग 2 दयासागरजी महाले सांस्कृतिक सभागृहावरून राहुल बोंद्रेंचा ‘रेटून खोटे बोल’ महोत्सव... चिखली शहराच्या सांस्कृतिक इतिहासात मैलाचा...
spot_img

निष्ठावंत कार्यकर्त्यांना कधीही न विसरणारे नेतृत्व : आ. सौ. श्वेता महाले पाटील.

निष्ठावंत कार्यकर्त्यांना कधीही न विसरणारे नेतृत्व : आमदार सौ.श्वेता महाले पाटील

विधानसभेची निवडणूक पार पडून चिखली विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा मोठा लेखाजोखा मांडला गेला. मात्र, विकासकामे आणि आमदार निवासस्थानी जमणाऱ्या कथित गर्दीच्या तुलनेत अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. तरीही या निकालाकडे सकारात्मकतेने पाहत श्वेता महाले पाटील यांनी आपल्या नेतृत्वाचा पुढील टप्पा अधिक खंबीरपणे उभारला.

पुन्हा आमदार झाल्यानंतर आणि राज्य व देशात भाजपाची सत्ता स्थापन झाल्यानंतर चिखली मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षातील नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे इन्कमिंग झाले. मात्र, “नवीन आमदार ते खंबीर आमदार” या प्रवासात आमदार श्वेता महाले पाटील यांनी ऐनवेळी आलेल्या राजकीय गणितांपेक्षा निष्ठेला अधिक प्राधान्य दिले.

मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग असूनही त्यांनी आपल्या कट्टर व निष्ठावंत कार्यकर्त्यांना कधीही दूर लोटले नाही. उलट, योग्य मान-सन्मान, प्रेम व आदर देत त्यांना बळ दिले. हीच बाब नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत ठळकपणे दिसून आली.

तीन दशकांची तपश्चर्या करणारे पंडितराव देशमुख यांचे शालेय वयात पाहिलेले नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न साकार झाले. आमदार श्वेता महाले पाटील यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यालाच नगराध्यक्षपदाचे तिकीट देत केवळ राजकीय निर्णय घेतला नाही, तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून हजारो घरांमध्ये पायी जाऊन मतांचा जोगवा मागत त्या स्वप्नाला कष्टाची जोड दिली.

नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी तिकीट वाटप करताना अनेक इच्छुक होते. काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे तिकीट देता आले नाही. त्यामध्ये तत्कालीन शहराध्यक्ष सागर पुरोहित यांचा समावेश होता. मात्र, आमदार श्वेता महाले पाटील यांनी त्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवत स्वतः त्यांच्या घरी जाऊन समजावणी काढली.

याच विश्वासातून नगराध्यक्ष व नगरसेवक निवडणुकीची संपूर्ण धुरा सागर पुरोहित यांच्याकडे सोपवण्यात आली. निकालानंतरही आमदार श्वेता महाले पाटील, नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्यासोबत पहिल्या रांगेत, दिवसभर जीपमध्ये सागर पुरोहित यांना मानाचे स्थान देण्यात आले.

नुकत्याच झालेल्या पदग्रहण सोहळ्यात महायुतीची सत्ता चिखली नगरपरिषदेत स्थापन झाल्यानंतर महायुतीतील सर्व पक्षांच्या सन्माननीय सदस्यांना मंचावर आमंत्रित करून योग्य मान देण्यात आला. स्वतःहून पुढाकार घेत सर्वांना सामावून घेण्याची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली.

या सर्व घटनांवरून आमदार श्वेता महाले पाटील या केवळ विकासकामांपुरत्याच मर्यादित नसून, निष्ठावंत कार्यकर्त्यांची काळजी, त्यांचा सन्मान आणि विश्वास जपणारे नेतृत्व असल्याचे ठळकपणे दिसून येते. चिखलीच्या राजकारणात “निष्ठा आणि नेतृत्व” यांची सांगड घालणारी ही भूमिका आगामी काळातही विकासाला दिशा देणारी ठरणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या