31.2 C
New York
Friday, June 12, 2026

Buy now

ध्यास भल्याचा…आ. श्वेता महालेंचा, महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापना ते आर्थिक स्वायत्तता..

वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ : श्वेता महाले पाटील यांच्या अथक प्रयत्नांना ऐतिहासिक यश! चिखली विधानसभेच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला...
spot_img

राहुल बोंद्रे यांचे ‘खोटे बोल पण रेटून बोल’ अभियान उघड !…. भाग 1

राहुल बोंद्रे यांचे ‘खोटे बोल पण रेटून बोल’ अभियान उघड !…. भाग 1

राहुल बोंद्रे यांची कार्यपद्धती आता चिखलीकरांच्या लक्षात येऊ लागली आहे.खोटे बोलायचे, तेही इतक्या आत्मविश्वासाने की तेच सत्य वाटावे, हा त्यांचा जुना आणि आजमावलेला फॉर्म्युला! केवळ आरोप करायचा, वातावरण गढूळ करायचे आणि पुराव्यांची वेळ आली की शेपूट आत घालून तमाशा पाहायचा, अशी त्यांची रणनीती आहे. पवित्र विषयावर राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आता ‘प्राण संविधान’च्या माध्यमातून सुरू होणाऱ्या “खोटे बोल पण रेटून बोल” या लेखमालिकेद्वारे आम्ही उघडा पाडणार आहे…

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा चिखली शहरात उभा राहावा, ही तमाम शिवप्रेमींची अनेक वर्षांची मनोकामना. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी पुढाकार घेतला आणि सर्वपक्षीय समिती स्थापन करून एक विधायक पाऊल उचलले. मात्र, या ऐतिहासिक कामात हातभार लावण्याऐवजी, माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी राजकारणाचा ‘अश्व’ उधळत केवळ आरोपांचा धुरळा उडवण्याचे काम सुरू केले.

भ्रष्टाचार” हा शब्द त्यांच्या तोंडात इतक्या सहजतेने येतो, जणू तो शब्द उच्चारला की आरोप आपोआप सिद्ध होतील! पण आजवर त्यांनी या आरोपांचा एक तरी पुरावा दिला आहे का?पुराव्याच्या मैदानात मात्र “बोंद्रेंची वाणी” अचानक गप्प होते,कामात खोडा घालण्यासाठी राहुल बोंद्रे यांनी ‘भ्रष्टाचार’ शब्दाचा शंखनाद केला. “भ्रष्टाचार झाला” म्हणून भुई थोपटणाऱ्या बोंद्रे यांनी आजवर या आरोपांचा एकही पुरावा जनतेसमोर ठेवलेला नाही.

​चिखलीच्या सौंदर्यात मानाचा तुरा ठरणारा हा पुतळा जर आमदार श्वेता महाले यांच्या कार्यकाळात पूर्ण झाला, तर त्याचे सर्व श्रेय (Credit) त्यांनाच मिळेल, या भीतीने बोंद्रे यांनी हा ‘खोटेपणाचा’ सपाटा लावल्याचे चित्र दिसत आहे…’श्रेयाची भीती आणि अपयशाची जळजळ ‘झाकण्यासाठी खोट्यांची धग पेटवली जात आहे. स्वतः काहीच घडवता न आल्याने दुसऱ्यांच्या कार्यावर शिंतोडे उडवण्याची ही जुनी सवय आता उघडपणे दिसू लागली आहे…

Related Articles

ताज्या बातम्या