-1.2 C
New York
Friday, December 5, 2025

Buy now

भाजपने भ्रष्टाचारी नगराध्यक्षाला हाकलून दिले… बिनचेहऱ्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष… देवेंद्र फडणवीस

भाजपने भ्रष्टाचारी नगराध्यक्षाला हाकलून दिले... बिनचेहऱ्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष... देवेंद्र फडणवीस चिखलीमध्ये दीर्घकाळ सत्ता भोगलेल्या 'बोन्द्रे' कुटुंबाने समाजाची, समाजातील सामान्य वर्गाची व गरीबांची कधी चिंता केली...
spot_img

चिखलीत काँग्रेस घराण्याचे जुने खेळ आता संपायला हवेत! नगराध्यक्ष नेहमी ‘सव्वाशे लोकसंख्येवाला’ का?

चिखलीत काँग्रेस घराण्याचे जुने खेळ आता संपायला हवेत!

मुस्लिमांची संख्या प्रचंड, मराठ्यांची संख्या प्रचंड, पण ‘युवा नगराध्यक्ष मात्र नेहमी ‘सव्वाशे लोकसंख्येवाला’ का?

चिखलीत गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेस घराण्याने सत्ता आपल्या मुठीत घट्ट पकडून ठेवली आहे. काँग्रेसने या सत्तेचे रक्षण करण्यासाठी मुस्लिम समाजाला नेहमी हातचा राखून ठेवले — वापरायचे, पण कधीही पुढे आणायचे नाही.असा आरोप आता चिखली नगर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसवर होत आहे.ज्या लोकांची संख्या ‘सव्वाशे’ त्यांनी चिखलीचे नगराध्यक्षपद 40 वर्ष भोगले आणि ज्यांची हजारो संख्या त्यांना काय मिळाले?आता किमान चिखली नगराध्यक्ष पद एखाद्या मराठा किंवा मुस्लिम युवकाला का मिळू नये? राहुल बोंद्रे युवा नगराध्यक्ष, कुणाल बोंद्रे युवा नगर अध्यक्ष, प्रियाताई बोन्द्रे युवा नगराध्यक्ष, क्वालिटीवाले सचिन बोन्द्रे युवा मग मराठा व मुस्लिम कुठे गेले? की या दोन समाजात नगराध्यक्ष पदासाठी लायकी असलेले युवाच नाहीत?

काँग्रेसच्या या घराणेशाही राजकारणाने मुस्लिम व मराठा समाजात जाणीवपूर्वक दोन थर निर्माण केले एक थर म्हणजे काही निवडक “सेठ”,पाटील” ज्यांना थोडेफार पद, मान किंवा काम दिले गेले;आणि दुसरा थर म्हणजे बहुसंख्य मुस्लिम व मराठा जनता — जी या “सेठांच्या व पाटलांच्या माध्यमातून” वापरली गेली, फसवली गेली, आणि कायम मागे ठेवली गेली.

ही सगळी रचना अशीच तयार करण्यात आली की, मुस्लिम व मराठा समाज एकजूट होऊ नये, विचार करू नये, आणि सत्ता कोणाच्या हातात आहे हे विचारण्याची हिंमत करू नये.परंतु आजची सुशिक्षित मुस्लिम व मराठा पिढी या खेळाला ओळखते का?आता ते “काँग्रेस कम बोंद्रे” या सत्तेच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा निर्धार करतील का?

मुस्लिम व मराठा समाजाला आता वापरले जाण्याची नाही — निर्णय घेण्याची वेळ आली आहे.जे लोक सत्तेचे रक्षण स्वतःच्या घराण्यापुरते करतात, त्यांनी मुस्लिम व मराठा समाजाला कायमच् सावलीत ठेवले.

हे धोरण बदललेच पाहिजे असा विचार चिखलीतील तरुण सुशिक्षित मुस्लिम व मराठा युवकांनी केला पाहिजे. ते स्वतः सत्तेत वाटा मागणार नाहीत तर कोणताही राजकीय पक्ष त्यांना सत्तेत कधीच वाटा देणार नाही! त्यामुळे आता मागायचे असेल तर नगराध्यक्ष पद मागा! जो देईल त्याच्यासोबत जा मग ते काँग्रेस असो!भाजप असो!की शिवसेना असो…. एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीने महाराष्ट्रातील 13 नगरपालिका मध्ये सत्ता स्थापन झालेली आहे हाही मुस्लिम लोकांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो…!

Related Articles

ताज्या बातम्या