इतना सन्नाटा क्यू है भाई….
चिखलीच्या शांततेत दडलय तरी काय?
राहुल बोंद्रे यांनी फेसबुक लाईव्ह केलं त्यानंतर भाजपच्या अनेक शहराध्यक्ष सह अनेक नेत्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शैलेश गोंधणे यांनी गुन्हा दाखल केला, हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल बोन्द्रे यांची ओपन हार्ट सर्जरी, सहा ब्लॉकजेस आणी गुंतागुंतिची शस्त्रक्रिया उघड केली. एवढी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झालेल्या माणसाचे बंबाट धावताना चे फोटो मीडियाने प्रसिद्ध केले. आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी तमाम चिखलीकर व बुलढाणा जिल्हावासी उत्सुक असताना, चिखलीत दोन दिवसापासून एकदम सन्नाटा आहे….
दहशतवाद्यांना लावतात ती कलमे राहुल बोंद्रे यांच्यावर लावलेली आहे तर अजून त्यांना अटक कशी झाली नाही? गणपती विसर्जन पर्यंत पोलीस प्रशासनाला ब्रेक हवा आहे का? कुणाल बोंद्रे यांचे नाव एफ.आय.आर. मध्ये कसे नाही? कुणाल बोंद्रे यांचे शैलेश गोंधणे यांच्याशी असलेले संबंध कामी आले?की कुणाल बोंद्रे यांनी आपल्या ‘जुन्या घरातील’ भाजपाचे संबंध वापरले? असे बरेच प्रश्न आहेत, तरी पावसामुळे बेजार झालेल्या चिखलीकरांना नवीन खबरीची उत्सुकता लागून आहे…..


