” काँग्रेसने हमे सिर्फ इस्तमाल किया, हमारी तरक्की करने वाली श्वेताताई को ही हम वोट देंगे ”
विकासकामांमुळे मुस्लिम समाजात वाढला श्वेताताईंचा जनाधार
चिखली : ” काँग्रेसने हमे आज तक केवल मजहब के नाम पर भडका कर इस्तमाल किया लेकिन हमारी तकलीफे आज तक जैसे की वैसे ही रही | ना हम सुधरे ना हमारे हालात सुधरे | लेकिन श्वेताताईने ढाई साल मे हमे जितना दिया उसकी बराबरी काँग्रेसवाले ६० सालोमे भी नही कर सकते | इसलिये हमारे काम करने वाली हमारी तरफ की करने वाली श्वेताताई को ही हम वोट देंगे | ” असा निर्धार चिखली मतदारसंघातील मुस्लिम महिला व पुरुष मतदार मोठ्या संख्येने व्यक्त करत आहेत. जन आशीर्वाद दौऱ्यानिमित्त ग्रामीण भागात फिरताना मुस्लिम मानसिकतेचा कानोसा घेतल्यावर हा प्रतिनिधिक सूर लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
चिखली विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार म्हणून भाजपाच्या आमदार श्वेताताई महाले या निवडणूक रिंगणात सलग दुसऱ्यांदा उतरल्या आहेत. त्यांना शहर व ग्रामीण भागात उस्फूर्त पाठिंबा मतदारांकडून मिळत आहे, सध्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या जन आशीर्वाद दौऱ्यानिमित्त प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमधील गावोगावी श्वेताताई भेट देत असून सर्व जाती-धर्माच्या नागरिकांकडून त्यांचे उत्साहात स्वागत होताना दिसते. यामध्ये मुस्लिम धर्मीय मतदारांचा देखील सहभाग असल्याचे जाणवते. विशेषतः मुस्लिम युवक आणि महिलांकडून ठिकाणी श्वेताताई महाले यांचे उत्साहात स्वागत केले जात आहे.


