मनोज जरांगे हा राजकीय दृष्ट्या प्रेरित माणूस असून त्यांना राजकीय,सामाजिक,ऐतिहासिक आणी सांस्कृतिक अशी कुठलीही समज नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील एका बड्या नेत्याने हा माणूस लायकीपेक्षा खूप मोठा केल्याचा आव आणला असून हा सगळा खेळ महाराष्ट्राच्या “पावर हाऊस” मानल्या जाणाऱ्या नेत्याकडून उभारला गेला आहे. यामध्ये मराठवाडा विभागातील मराठ्यांचा नक्कीच बळी जाणार आहे, विदर्भातील लोकांनी या जरांगेच्या नादी लागून आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये. असे प्रतिपादन प्राध्यापक शिवाजी काळे यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
साठ च्या दशकात पंजाबराव देशमुखांनी मराठा शेतकरी, मराठा नसून मराठा ‘कुणबी’ आहे अशी मांडणी केली आणि ती घटनात्मक रीत्या मंजूर करण्यात आली. त्यावेळी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कुणबी असल्याची प्रमाणपत्र मिळवली. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी मात्र ‘आम्ही जमीनदार आहोत, आम्ही स्वतःला ओबीसी म्हणवून घ्यायचं का?’ असं म्हणत पंजाबरावांच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केलं. आता 40 वर्षांनंतर विदर्भातील पूर्वाश्रमीच्या मराठा शेतकऱ्यांची तिसरी पिढी कुणबी प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाचा लाभ घेत आहे, तर इकडे मराठा शेतकरी आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरला आहे,” असं मत ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी व्यक्त केलं आहे.
कुणबी आणि मराठा हा समाज एक आहे असा जो दावा आहे तो तितका खरा नाही. याचं स्वरूप आपल्याला वर्गाच्या स्वरूपात समजून घ्यावं लागेल. जमीनदारी गेल्यानंतर याच वर्गातील लोक शेती करू लागले. पण तत्कालीन जमीनदार वर्ग आणि कुणबी या दोन्ही वर्गात फरक होता.
कुणबी म्हणजे प्रत्यक्ष शेती करणारा वर्ग तर ज्यांच्या मालकीच्या जमिनी होत्या तो वर्ग जमीनदार, वतनदार किंवा प्रशासकीय पद असणारा वर्ग होता त्यांनी स्वतःला मराठा म्हणवून घेतले व कुणबी वर्गाला “खालचे” या स्तरावर सामाजिक वागवणूक दिली.आता वेगळ्या प्रवर्गात आरक्षण देऊनही महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या पेटत ठेवायचा असल्याने महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे नाचत आहे.तरी या जरांगे सारख्या प्रवृत्तीच्या नादी लागून विदर्भातील कुणबी समाजाने आपल्या विदर्भाचे भले पाहणाऱ्या विदर्भातील नेत्यांनांच आगामी निवडणुकीत मतदान केले पाहिजे.अन्यथा आता कुठे मागील पाच वर्षात विदर्भाला आपल्या हक्काचा जो विकास प्राप्त होतोय त्यालाही पश्चिम महाराष्ट्रातील नेत्याच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या मराठवाड्यातील जरांगेच्या नादी लागून आपण गमावून बसू असेही प्रा. शिवाजीराव काळे म्हणाले.


