कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितलं होतं की करीनाला इंडस्ट्रीमधील सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी माहित असतात. तर आता आलियानं चक्क नणंद रिद्धिमा कपूरला ‘चुगलीखोर’ म्हटलं आहे. आलियानं सांगितलं की रिद्धिमाजवळ रणबीर कपूरपेक्षा जास्त मोठ्या गॉसिप असतात.
रिद्धिमा कपूर साहनीविषयी बोलायचं झालं तर ती एक ज्वेलरी डिझायनर आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या Fabulous Lives of Bollywood Wives च्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसत आहे. या सीरिजमधून रिद्धिमा ही स्क्रीनवर पदार्पण करणार आहे. या सगळ्यात आलिया भट्टचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आलियाचा हा व्हिडीओ ‘गलाट्टा इंडिया’नं शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये आलियानं नणंद रिद्धिमाला कुटुंबातील सगळ्याक मोठी गॉसिप क्वीन म्हटलं आहे. ती रिद्धिमाला चिडवत म्हणाली की तिला इंडस्ट्रीमधील छोट्यापासून मोठ्या गॉसिपपर्यंत सगळं माहितीये. मुळात ती जे काही सांगते ते नंतर खरं असल्याचं कळतं. आलिया म्हणाली, जर जगात कोणी आहे, ज्याला सगळी माहित असेल, तर ती रिद्धिमा आहे. ती अगदी सहजपणे मोठ्या मोठ्या गॉसिप सांगते. ती जे काही सांगते ते अखेर सत्य निघतं. तिला रणबीरपेक्षाही जास्त माहिती असते.
आलियानं पुढे रिद्धिमाची स्तुती केली आणि सांगितलं की ती खूपचं प्रेमळ आणि दयाळू व्यक्ती आहे. ती राहाचा आवडती आत्या आहे. आलियानं सांगितलं की रिद्धिमा तिची नणंद नाही तर बहीण आहे. Fabulous Lives of Bollywood Wives या सीरिजच्या तिसरा भाग हा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.


