भाजपने भ्रष्टाचारी नगराध्यक्षाला हाकलून दिले… बिनचेहऱ्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष… देवेंद्र फडणवीस
चिखलीमध्ये दीर्घकाळ सत्ता भोगलेल्या ‘बोन्द्रे’ कुटुंबाने समाजाची, समाजातील सामान्य वर्गाची व गरीबांची कधी चिंता केली नाही. एवढा दीर्घकाळ नगरपालिकेची सत्ता या कुटुंबाकडे असताना सुद्धा त्यांनी कधी चिखलीची व चिखलीकर यांची काळजी केली नाही, तर फक्त स्वतःच्या भ्रष्टाचाराने तुंबड्या भरायचं काम केलं, परंतु भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे की त्यांच्याच पक्षाच्या नगराध्यक्षांनी गडबड केली, भ्रष्टाचार केला तेव्हा स्वतः पक्षाने त्याच्या पेकाटात लाथ घालून त्याला देखील काढून टाकले. एवढी पारदर्शकता भारतीय जनता पक्षामध्ये असून भ्रष्टाचाराला या पक्षामध्ये अजिबात स्थान नाही असे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील राहतात व येथील प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांना फक्त अफवा पसरवण्याचे काम असून संविधानाबद्दल,बॉम्बे मार्केट बद्दल आणि विविध विकासाच्या योजना बद्दल हे दोघे नेहमी अफवा पसरवत असतात असे आमदार श्वेता महाले पाटील यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिले तेव्हा काँग्रेसला आता महाराष्ट्रात कुणीही ओळखत नसलेला प्रदेशाध्यक्ष मिळालेला आहे त्यामुळे ओळख मिळवण्यासाठी तेवढीच गोंगाट करत राहतात परंतु विरोधकांनी पसरवलेल्या या अफवांकडे लक्ष देऊ नका बॉम्बे मार्केटला कोणीही हात लावणार नाही तेथील व्यापारी जे ठरवतील तेच चिखली मध्ये होईल असा शब्द मी देतो, आमदार सौ श्वेता त्यांच्या पाठीशी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या रूपाने आम्ही उभे आहोत तुम्ही मतदानाच्या रूपाने पंडित दादांच्या पाठीशी उभे राहा संपूर्ण महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीमागे तुमच्या विकासासाठी कार्यरत राहील, मी अतिशय सकारात्मक माणूस असून मला विकासाबाबत बोलणे आवडते त्यामुळे मला तुम्ही कधी नाराज केले नाही आताही भारतीय जनता पक्षाकडे संपूर्ण सत्ता द्या व चिखली साठी दोन किंवा तीन नव्हे तर चार इंजिनची ताकद विकासाला द्या असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले..


