चिखलीत मुस्लिम युवकांचा काँग्रेसला रामराम – भारतीय जनता पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश
आ. श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वावर मुस्लिम समाजाचा विश्वास
चिखली (प्रतिनिधी) :
आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर चिखली शहरातील अनेक मुस्लिम युवकांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकल्याचे स्पष्ट होत आहे. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षे मुस्लिम समाजाचा केवळ राजकीय वापर करून त्यांना प्रगतीपासून वंचित ठेवणाऱ्या काँग्रेसविरोधात मुस्लिम समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मुस्लिम समाजाच्या नावावर नेहमीच भावनिक मुद्द्यांचा आधार घेऊन मतदानाचे राजकारण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत राहिला. मागील विधानसभा निवडणुकीत देखील मुस्लिम समाजाला भूलथापा देऊन जातीय आवाहन करण्यात आले. परंतु समाजातील युवकवर्गाने आज त्यामागचा डाव ओळखला असून विकास हाच खरा मुद्दा मानून त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
आ. सौ. श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिखली मतदारसंघात सर्व समाजघटकांच्या विकासासाठी पारदर्शक व प्रामाणिक प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये मुस्लिम समाजालादेखील शैक्षणिक, सामाजिक व पायाभूत सुविधा उभारणीत मोठ्या प्रमाणात संधी मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या धोरणावर व नेतृत्वावर मुस्लिम युवकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांचा आणि फसव्या घोषणांचा पर्दाफाश होत असल्याने मुस्लिम युवक व काँग्रेस यांच्यामध्ये आता पूर्ण दुरावा निर्माण होत आहे. विकासाचा मार्ग स्वीकारत भाजपकडे समाज आकर्षित होत असून, नगरपरिषद निवडणुकीतही हा कल ठळकपणे उमटेल, असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


