1.2 C
New York
Saturday, January 17, 2026

Buy now

राहुल बोन्द्रे यांचे चुकले काय?फरक नितीचा की नियतीचा?.. भाग 3

राहुल बोन्द्रे यांचे चुकले काय?फरक नितीचा की नियतीचा?.. भाग 3 एकीकडे कागदावरची सूतगिरणी, दुसरीकडे प्रत्यक्ष उत्पादनाचा कारखाना.. चिखली विधानसभा मतदारसंघात उभारण्यात आलेल्या दोन सहकारी सूतगिरण्या आज...
spot_img

चिखलीत काँग्रेस मुस्लिमांचा वापर करून घेते ; शिवसेना भाजप उघड मुस्लिमविरोधी,नगराध्यक्षपद पदासाठी मुस्लिम युवकांचे नवीन विचार ?

चिखलीत काँग्रेस मुस्लिमांचा वापर करून घेते ; शिवसेना भाजप उघड मुस्लिमविरोधी,नगराध्यक्षपद पदासाठी मुस्लिम युवकांचे नवीन विचार ?

चिखली (प्रतिनिधी):

चिखली नगरपालिकेच्या निवडणुकीची रंगत वाढत असताना काँग्रेसच्या उमेदवारीच्या चर्चेत पुन्हा एकदा केवळ बोंद्रे घराण्याचीच नावे पुढे येत आहेत. मुस्लिम समाजाच्या निर्णायक मतांवर काँग्रेस सत्ता टिकवते, मात्र नगराध्यक्षपद मुस्लिमांना नाकारले जाते,मुस्लिम समाजातील काही व्यक्ती पक्षांच्या अधिकृत एजेंट सारखे मुस्लिम युवकांना गृहीत धरून आपल्या आपल्या पक्षाच्या नेतृत्वाला खुश करून समाजाला मात्र गुन्हेगारी, बेरोजगारी या दिशेने लोटत आहेत. असा विश्वासच नागरिकांमध्ये बळावत आहे.

बाबू लॉजमध्ये उसळली हाणामारी – युवकांचा संताप

काही दिवसांपूर्वी रक्तदानासारख्या पवित्र कारणावरून बाबू लॉज परिसरात मुस्लिम युवकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेमुळे मुस्लिम युवकांच्या दाबलेल्या राजकीय आकांक्षा उफाळून आल्या असल्याची जनतेत चर्चा आहे.

युवक स्पष्ट बोलतात : “काँग्रेसने मतांचा वापर केला, भाजप-शिवसेनेने दडपशाही केली… आता आमचे नेतृत्व आम्हीच घडवणार!”

काँग्रेसची खेळी : मतं आमची, खुर्ची बोंद्रेंची?वृषाली बोंद्रे, सचिन बोंद्रे, कुणाल बोंद्रे, काशिनाथ बोंद्रे…हीच नावे वारंवार चर्चेत का येतात? मुस्लिम समाजाची मतं काँग्रेस घेतो, पण नगराध्यक्षपदासाठी उमेदवार मात्र कायम बोंद्रे घराण्यातीलच! :“काँग्रेसला आमच्या मतांची गरज असते, पण सत्ता मिळाली की आमचं अस्तित्वच विसरलं जातं.”

भाजप-शिवसेना : हिंदुत्वाचा नारा, मुस्लिमांचा बहिष्कार: शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष उघडपणे हिंदुत्वाच्या राजकारणावर चालतात. त्यामुळे मुस्लिम समाजाचा नगराध्यक्ष होणे या पक्षांच्या राजकारणात अशक्य आहे,“भाजप-शिवसेना आम्हाला केवळ बाजूला ठेवतात. नगराध्यक्षपद तर दूरच, आमच्या समस्या ऐकायलाही कोणी तयार नसतं.”असे नागरिकांचे मत आहे

बुलढाणा पॅटर्न : चिखलीतही समीकरण बदलणार?

बुलढाणा नगरपालिकेत याआधी अल्पसंख्याक समाजाने एकत्र येऊन मुस्लिम नगराध्यक्ष निर्माण केला होता. त्याच धर्तीवर चिखलीतही मुस्लिम, बौद्ध, मातंग, माळी समाजाने एकत्र आल्यास काँग्रेस-भाजप-शिवसेना यांचे सर्व गणित उद्ध्वस्त होऊ शकते, अशी चर्चा रंगत आहे.

नवीन समीकरणांची चाहूल:काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षांविषयी मुस्लिम युवकांमध्ये प्रचंड नाराजी वाढली आहे. त्यामुळे या वेळी स्वतःचे नेतृत्व उभे करण्याचा निर्धार मुस्लिम समाज करेल का? यावेळी तरी कुणाच्या ताटाखालचे मांजर न होता स्वतंत्रपणे स्वतःचे अस्तित्व दाखवण्याची वेळ आली आहे व आम्ही कोणत्याच पक्षाच्या दावणीला बांधलेलं नाही हे सिद्ध करण्यासाठी मुस्लिम युवक व नागरिक काय करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस केवळ मतांसाठी मुस्लिम समाजाचा वापर करते, तर शिवसेना-भाजप खुलेआम मुस्लिमविरोधी राजकारण करतात. अशा तिढ्यात मुस्लिम युवक स्वतःचे राजकीय समीकरण उभे करण्यास कटिबद्ध दिसत असून येणाऱ्या निवडणुकीत चिखलीच्या राजकारणात मोठा भूचाल येऊ शकतो.!!

Related Articles

ताज्या बातम्या