उदयनगर येथील तोरणा गुरुकुल मध्ये “शिक्षकांची भरती”..
उदयनगर येथे पूर्णपणे सी.बी.एस.ई अभ्यासक्रमावर आधारित अतिशय तंत्रशुद्ध व आधुनिक अभ्यासक्रमाच्या सहाय्याने मुलांच्या भविष्याला अतिशय आनंददायी पद्धतीने आकार देण्याचे काम करणाऱ्या तोरणा गुरुकुल मध्ये सहायक शिक्षक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.इंग्रजी, मराठी, गणित, हिंदी, विज्ञान,संगणक शिक्षक, स्पोर्ट्स आणि कला या विषयांसाठी योग्य आणि जबाबदार शिक्षकांनी आपले अर्ज 15 मे पूर्वी tornagurukul@gmail.com
या मेल आय डी वर पाठवावे असे आवाहन “तोरणा गुरुकुल” कडून करण्यात आले आहे.अतिशय चांगल्या वातावरणात अतिशय चांगले भविष्य असलेली संधी बुलढाणा जिल्ह्यातील युवक व युवतींना चालून आली आहे, त्यासाठी संबंधित विषयात प्रविण्य असलेल्या शिक्षकांनी आपले अर्ज वरील ई मेल ऍड्रेसवर मेल करण्यास सुचवण्यात आले आहे.


