9.6 C
New York
Wednesday, January 14, 2026

Buy now

राहुल बोन्द्रे यांचे चुकले काय?फरक नितीचा की नियतीचा?.. भाग 3

राहुल बोन्द्रे यांचे चुकले काय?फरक नितीचा की नियतीचा?.. भाग 3 एकीकडे कागदावरची सूतगिरणी, दुसरीकडे प्रत्यक्ष उत्पादनाचा कारखाना.. चिखली विधानसभा मतदारसंघात उभारण्यात आलेल्या दोन सहकारी सूतगिरण्या आज...
spot_img

लोकसंवाद मध्ये सहभागी व्हा…! शासकीय सुविधाचा जनतेने लाभ घ्यावा व आपल्या तक्रारी मांडाव्यात… आ सौं. श्वेताताई महाले

आ. सौं. महाले यांचा लोकसंवाद कार्यक्रम…

शासकीय सुविधाचा जनतेने लाभ घ्यावा व आपल्या तक्रारी मांडाव्यात… आ सौं. श्वेताताई महाले

शंभर दिवस शासकीय कार्यालयांना एक दिशादर्शक व निर्धारित परिणाम साध्य करण्यासाठी टारगेट ओरिएंटेड कार्यक्रम देणाऱ्या फडणवीस सरकारने सरकार स्थापन होऊन पाच महिने झाल्यानंतर, मा. मुख्यमंत्री यांच्या निकट मानल्या जाणाऱ्या मा. आ. सौ श्वेताताई महाले पाटील आमदार चिखली यांनी सामान्य लोकांशी सतत संवाद सुरु ठेवून सामान्य जनतेला शासकीय कार्यालयामधून नेहमी त्वरित व उच्च दर्जाच्या शासकीय सेवा मिळाव्यात म्हणून प्रयत्न केले आहेत.त्यांच्या याच प्रयत्नांचे पुढचे पाऊल म्हणून आ. सौं. श्वेताताई महाले पाटील यांनी ग्रामीण व शहरी भागातील सामान्य लोकांना सर्व प्रकारच्या शासकीय सेवा, दाखले आणि ग्रामीण व शहरी भागातील जनतेला शासकीय कार्यालयासंदर्भात असलेल्या तक्रारी यांचा निपटारा करण्यासाठी ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील लोकांशी संवाद साधून त्यांना एकाच ठिकाणी व त्वरित शासकीय सेवा मिळाव्यात यासाठी लोकसंवाद आयोजित केला आहे.

या लोक संवादमध्ये आ. सौं श्वेताताई महाले पाटील या स्वतः सर्व शासकीय अधिकाऱ्यांसोबत जनतेच्या तक्रारी व सूचना ऐकून घेणार असून जनतेच्या तक्रारीचा त्वरित निपटारा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

हा लोक संवाद दिनांक 5 मे सोमवार रोजी सुरु होणार असून सुरुवातीला पहिल्या दिवशी शहरी भागातील नगरपरिषद मध्ये ज्या लोकांची कामे असतील त्या लोकांनी सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत नगर परिषद कार्यालय चिखली येथे उपस्थित राहावे असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांचे कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

दुसऱ्या दिवशी मंगळवार दि. 6 मे रोजी ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी व त्यावर कार्यवाई करनेकरिता आ. सौं. श्वेताताई महाले सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पंचायत समिती कार्यालय चिखली येथे उपस्थित राहणार असून ग्रामीण भागातील पंचायत समितीशी संबंधित कामे व तक्रारी यांची सर्व अधिकाऱ्यांसमक्ष आमदार सौं. महाले प्रत्यक्ष पाहणी व सोडवणूक करणार आहेत.

त्याचप्रमाणे चिखली विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या बुलडाणा तालुक्यातील ग्रामीण जनतेच्या समस्या निवारण साठी लोक संवाद दिनांक 7 मे बुधवार रोजी वेळ सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत स्थळ : देशमुख टॉवर धाड ता जि बुलडाणा येथे आयोजित केला आहे.

लोकांसाठी,लोकांच्या हक्काचा दरबार! संवाद आपुलकीचा… विश्वासाचा असे विश्वासक नवीन नाते सामान्य जनतेशी जोडण्याकरिता आ. सौं. श्वेताताई महाले यांनी सर्वांनी या लोकसंवादमध्ये सहभागी होऊन आपल्या तक्रारी मांडाव्यात व शासकीय सेवा या आपला हक्क असून त्या मिळण्यासाठी या लोकसंवादमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या