गावातील माणसामाणसांमध्ये भांडणे लावून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे व त्यातून सत्तेकडे जाण्याचा आपला मार्ग प्रशस्त करण्याकडे जवळपास सगळ्या राजकारण्यांचा कल असतांना योग्य नेतृत्व मानवी मनांना जोडण्याचे काम कशाप्रकारे करते,याचा प्रत्यय रानअंत्री या गावातील दोन राजकीय व्यक्तिमत्वांच्या आ. श्वेताताई यांच्या समर्थनार्थ एकत्र येण्यातून दिसून आला.
“रानअंत्री संस्थान हे आपल्या भागातील एक पौराणिक आणि तितकेच महत्त्वाचे धार्मिक केंद्र आहे.परंतु गत अनेक वर्षे याकडे राजकीय पोळी भाजुन घेणाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने याठिकाणी पाहिजे तसा विकास होऊ शकला नाही.या गावातील श्री तात्याराव झाल्टे व श्री संदीप झाल्टे हे दोघेही या गावाचे माजी सरपंच असून दोघे वैचारिकदृष्ट्या राजकीय विरोधक होते परंतु चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा वसा घेतलेल्या आ. श्वेताताई महाले यांनी रानअंत्री गावातील विकासकामांबाबत घेतलेली सकारात्मक भूमिका व प्रत्यक्षात केलेला विकास यामुळे तात्पुरते वैचारिक राजकीय विरोधक असलेल्या झाल्टे बंधूंनी देखील आपसातील राजकीय विरोध बाजूला सारून विकासकन्या आमदार श्वेताताई महाले यांना पुन्हा चिखली विधानसभा मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी गावाच्या अधिक विकासाकरिता आपसातील मतभेद बाजूला सारण्याचे ठरवले असून हे दोघेही जन आ. श्वेताताई महाले यांच्या ऐतिहासिक विजयासाठी एकत्रित प्रयत्न करत आहेत.
देशविदेशात भला मोठा भक्त वर्ग असलेल्या या संस्थानाकडे पुरेशी देणगी नसल्याने हवा तसा विकास येथे झाला नव्हता गत काही दिवसा पासुन रखडलेल्या कामा संदर्भात रानअंत्री येथील सरपंच तथा समविचारी नागरीकांनी आ.श्वेताताई महाले यांची भेट घेतली आणि देवस्थानला “ब”दर्जा मिळवून देण्याची मागणी केली.धार्मिक बाबतीत अत्यंत संवेदनशील मन असणाऱ्या आ.श्वेताताई महाले यांनी देखील या कामासाठी पुढाकार घेऊन वेळोवळी यासाठी प्रयत्न केले.आणि शासन स्तरावर पाठपुरावा केल्या नंतर संस्थांनाला “ब”दर्जा प्राप्त झाला.त्यानंतर लगेच याठिकाणी ५० लक्ष रुपये निधी देखील मंजूर झाला काहीच दिवसामध्ये पुन्हा निधी मिळणार असुन या देवस्थानची काया पालट होणार आहे याबाब गावकरी समाधान व्यक्त करत असुन आ.श्वेताताई महाले यांच्या मेहनतीचे हे फळ असल्याचे गावकरी बोलत आहे.


