6.8 C
New York
Wednesday, January 14, 2026

Buy now

राहुल बोन्द्रे यांचे चुकले काय?फरक नितीचा की नियतीचा?.. भाग 3

राहुल बोन्द्रे यांचे चुकले काय?फरक नितीचा की नियतीचा?.. भाग 3 एकीकडे कागदावरची सूतगिरणी, दुसरीकडे प्रत्यक्ष उत्पादनाचा कारखाना.. चिखली विधानसभा मतदारसंघात उभारण्यात आलेल्या दोन सहकारी सूतगिरण्या आज...
spot_img

विकासाचा मुद्दा संपला काय ? पुन्हा हिंदू मुसलमान उकरून काढावे लागत आहे….. राहुल बोन्द्रे.

विकासाचा मुद्दा संपला काय? पुन्हा हिंदू मुसलमान उकरून काढावे लागत आहे….. राहुल बोन्द्रे.

सत्ता असूनही आमदार महोदयांना आपल्या विकासावर विश्वास राहिला नाही काय?विकासावरचा त्यांचा स्वतःचाच विश्वास उडाल्याने पुन्हा हिंदू मुस्लिम कार्ड खेळावे लागत आहे का? बबन राऊत आणी विजय पवार यांच्यासारख्या लोकांना मतदानाची दिनांक जवळ येताच एकदम अहंकारी वगैरे असलेल्या श्वेताताई नम्र झाल्या का? आणी सोयाबीन आपली वाट लावणार हे दिसताच देवेंद्र फडणवीस यांना भाव वाढवण्याची बुद्धी सुचली का?असे अनेक प्रश्न आहेत.अशा प्रश्न स्वरूपातील कोपरखळ्या माजी आमदार राहुल बोन्द्रे यांनी आ. श्वेताताई महाले यांना ठेवून दिल्या.

हिंदू राष्ट्र सेनेचे विजय पवार यांनी आपला पाठिंबा श्वेता ताई महाले यांना दिला असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.या पत्रकार परिषदेत बलदेव सिंग सपकाळ आणि इतर जुने भाजप कार्यकर्ते यांना योग्य मान दिला गेला असला पाहिजे.त्यामुळेच बलदेवजी सपकाळ ही पत्रकार परिषदेतही उपस्थित राहिले नसावे असेही माजी आ. राहुल बोन्द्रे म्हणाले.

बबन राऊत किंवा विजय पवार यांच्यासारख्या अगोदर बंड करून निवडणुकीच्या अगोदर जे आपण केले ते चुकीचे होते हे सांगण्यासाठी “आमदार व त्यांच्या चाणक्य” यांना जे परिश्रम घ्यावे लागले असतील, त्याच्यामुळे प्रामाणिक भाजपा कार्यकर्त्यांना भाजपामध्ये आता किती वाईट दिवस आले आहेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही असे माजी आमदार राहुल बोन्द्रे म्हणाले. बबन राऊत आणि विजय पवार यांच्या प्रकरणांमध्ये नेमकी या दोघांनी आमदार ताईंना माफी मागितली की आमदार ताईंनी या दोघांना माफी मागितली हे स्पष्ट व्हायला हवे असेही आमदार राहुल बोन्द्रे म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या