लोणार येथे ‘उद्धव ठाकरे ‘ यांची सिद्धार्थ खरात यांचेसाठी ‘जनसभा’
गद्दारांना माफी नाही! या एकाच तत्वावर करोडो शिवसैनिकांच्या हृदयात स्थान करून बसलेले हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आचार,विचार,निष्ठा आणी रक्ताचे खरे वारस उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या ‘ठाकरी बाण्यात’ …. “आजपर्यंत माझ्या शब्दावर विश्वास ठेवून अगदी दगड असलेल्या माणसांना देखील तुम्ही निवडून दिले,पण त्यांनी गद्दारी केली! पण आता चारित्र्यवान व प्रशासन अनुभवसंपन्न,सुशिक्षित व सुसंस्कृत अशा ” सिद्धार्थ खरात” यांना आपले मत द्या! तुमच्या मताला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ‘मान’ देण्याचा माझा ‘शब्द’ आहे हे ऐकण्याची संधी मेहकर लोणार वासियांना मिळत आहे.
येत्या 8 नोव्हेंबर रोजी लोणार येथील ग्रँड विश्वनाथ मंगल कार्यालय,लोणी नाका चौक, लोणार ,येथे मराठी मनाचे मानबिंदू हिंदुह्रुदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मेहकर लोणार मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा चे उमेदवार सिद्धार्थ खरात यांचेसाठी जाहीर सभा संपन्न होणार आहे.
लबाड, भ्रष्ट आणि सत्तापीपासू लोकांच्या विरोधात असलेल्या या लढाईमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानेच ही लढाई जिंकणे शक्य आहे.म्हणून लोणार येथे होणाऱ्या या ऐतिहासिक सभेत सर्वांनी सहभागी होऊन परिवर्तनाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन श्री सिद्धार्थ खरात यांनी केले आहे.


