सिद्धार्थ खरात यांच्या विजयाचा मार्ग सुकर….
पक्षांतर्गत बंड शमले, सिद्धार्थ खरात यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या… डॉ. गोपाल बच्छीरे
विधानसभा निवडणुकी साठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जदारांनी आपला अर्ज मागे घेण्याची काल शेवटची तारीख होती.अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा काँग्रेस कमिटीचे श्री लक्ष्मण घुमरे तसेच शिवसेनेचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छीरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून त्यामुळे सिद्धार्थ खरात यांच्या विजयाचा मार्ग अगदी सुकर झाला आहे.
लक्ष्मण घुमरे व गोपाल बच्छीरे हे महाविकास आघाडीतील मोठे प्रस्थ असून दोघांच्याही शब्दाला आणी नावाला मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा मान आहे.या दोघांनीही महाविकास आघाडीतर्फे आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून उमेदवारीची मागणी केलेली होती.परंतु सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या दोघांनीही अपक्ष अर्ज सादर केले होते.परंतु मेहकर मतदार संघातील मागील तीस वर्षातील भय, दहशत व भ्रष्टाचाराचे वातावरण समाप्त करण्याच्या मोठ्या ध्येयाचा भाग बनून या दोघांनीही आपली अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेऊन, महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले सुशिक्षित,सुसंस्कृत आणी अनुभवसंपन्न उमेदवार सिद्धार्थ खरात यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
चारित्र्यसंपन्न आणि अनुभवाने प्रचंड मोठे असलेले सुशिक्षित उमेदवार, सुसंस्कृत उमेदवार श्री सिद्धार्थ खरात यांना मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी,भविष्यासाठी निवडून द्यावे असे आवाहन डॉ. गोपाल बच्छीरे यांनी केले आहे.


