काँग्रेसने दडपशाही केली मात्र श्वेताताईंनी विकास केला – भाई विजय गवई
या विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाहीत. लोकसभेमध्ये संविधान बदल आणि आरक्षणाचे फेक नॅरिटीव्ह यावेळेस चालणार नाही. श्वेताताई महाले यांनी दलित व मुस्लिम समाजाची कधी नव्हे एवढी विकास कामे केली आहेत. मुस्लिम धर्मियांसाठी ठिकठिकाणी शादीखाने तर बौद्ध समाजासाठी बुद्ध विहार तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ देखील दलित व मुस्लिम समाजापर्यंत श्वेताताईंनी पोहोचवले. त्यामुळे हे दोन्ही समाज श्वेताताईंच्या पाठीशी मागे उभे राहतील असा विश्वास पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या स्थानिक उमेदवाराने दलितांना भ्रमित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पणतूला मतदारसंघात गावोगावी प्रचारासाठी फिरवणे सुरू केले आहे. मात्र, या उपायाने काहीही फरक पडणार नाही कारण, काँग्रेसने केलेली दडपशाही व हुकूमशाही याला जनता त्रस्त झाली असून श्वेताताईंनी केलेल्या विकासकामांची जाणीव ठेवून आंबेडकरी समाज त्यांच्या सोबत राहील अशी ग्वाही गवई यांनी आपल्या भाषणातून दिली.


