संविधान बदलाचे फेक नॅरेटिव्ह आता चालणार नाही..आ. श्वेताताई महाले
सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने मोदी सरकारच्या विरोधात जाणीवपूर्वक संविधान बदलणार असल्याचे फेक नॅरेटिव्ह चालवले होते. विशेषतः दलित समाजात हा दुष्प्रचार मोठ्या प्रमाणात झाला. त्याचे नुकसान महायुतीच्या बऱ्याच उमेदवारांना राज्यात झाले. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दलित समाजाबद्दलच्या योजना तसेच संविधानाबद्दल त्यांनी दाखवलेली आस्था व प्रतिबद्धता यामुळे आता दलित मागासवर्गीय समाजाचे मत परिवर्तन होत असून महाविकास आघाडीकडून संविधान बदलाचे फेक नॅरेटिव्ह आता चालणार नाही असा विश्वास चिखलीच्या विद्यमान आमदार श्वेताताई महाले यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई यांनीसुधा आपले मनोगत व्यक्त केले . इतर कुठल्याही अफवांना सक्षमपणे मोडून काढण्यासाठी महायुती समर्थ असून चिखली व बुलढाणा मतदारसंघात विद्यमान आमदार श्वेताताई महाले आणि संजय गायकवाड यांचा विजय निश्चित होईल अशी खात्री भाई विजय गवई यांनी व्यक्त केली.


