मागील 30 वर्षात मेहकरमधिल जनतेने सातत्याने या मतदारसंघात बराच त्रास भोगला. काय काय त्रास झाला? आम्हाला सगळं माहिती आहे! आज महाविकास आघाडी कडून उमेदवार म्हणून सिद्धार्थ खरात यांची घोषणा झाल्यानंतरच त्यांचा विजय निश्चित आहे.असे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी बोलतांना सांगितले.

पुढे बोलताना नरेंद्र खेडेकर म्हणाले की,खासदार आणि नंतर मंत्री झालेले प्रतापराव जाधव यांच्या रूपाने देशाच्या राजकारणात मेहकर चा चेहरा असतानाही मेहकरमध्ये बस स्टॅण्ड सारखी बेसिक सुविधाही नाही यावरून सत्ताधाऱ्यांनी मेहकरचा नाही तर फक्त स्वतः चाच विकास केला असल्याचे लक्षात येते.
अतिशय पोटतीडकीने बोलताना प्राध्यापक नरेंद्र खेडेकर म्हणाले की सिद्धार्थ खरात यांच्या साठी दिवसरात्र मतदारसंघ पायी घालायचा आम्ही ठरवला असून,भावनिक आवाहन करत त्यांनी निकालाच्या तारखेपर्यंत सर्वांनी डोळ्यात तेल घालून व पायाला भिंगरी बांधून अतिशय नम्रतेने आपल्या परिसरातील सर्व मतदारांना सिद्धार्थ खरात म्हणजेच दहशतमुक्त, सुसंस्कृत व विकसित मेहकर मतदारसंघासाठी मतदान करायचे आवाहन करा! त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेट द्या त्यांना खोट्या विकासाच्या स्वप्नातून जागे करा असे सांगितले.
प्रिंट मीडियाला, इलेक्ट्रॉनिक मीडियाला मॅनेज करून सोशल मीडियावर काहीजण आत्ताच पुन्हा आमदार झालेत.पत्रकार यांची गळचेपी करण्याचे प्रकार सुरू असल्यामुळे सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सिद्धार्थ खरात यांना मतदान करण्याचे आवाहन आपल्याला करायचे आहे.
प्रत्येक गावामध्ये फक्त सिद्धार्थ खरात हेच उमेदवार आहेत असं समजू नका, तर शिवसेना(उबाठा), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस(श.प.) यांनी आपले सर्वोच्च नेतृत्व या निवडणुकीत उभे आहे असे समजून ही निवडणूक प्रतिष्ठेची करावी असे आवाहन प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी केले.


