तुम्ही पिकनिकला जाता, फिरायला जाता, तेव्हा हॉटेल बुक करता. साध्या हॉटेलमध्ये एसी आणि पंखे असतातच. पण फाईव्ह स्टार हॉटेलात तुम्हाला फारसे पंखे दिसणार नाही. क्वचितच एखाद दुसऱ्या हॉटेलात सिलिंग फॅन असतात.
असं का होतं? हॉटेलात सिलिंग फॅन का नसतात? त्याचीच माहिती जाणून घेऊ या.तुम्ही कधी तरी फाइव्ह स्टार हॉटेलात गेला असाल. किंवा सिनेमात, बातम्यांमध्ये फाइव्ह स्टार हॉटेल पाहिली असतील. पण या हॉटेलातील एक गोष्ट तुम्ही मार्क केलीय का? फाइव्ह स्टार हॉटेलात सिलिंग फॅन नसतात, हे कधी तुम्ही पाहिलंय का? अनेक हॉटेलांमध्ये खरोखरच पंखे नसतात. सर्वच हॉटेलमध्ये नसतात असं नाही, पण बहुतेक फाइव्ह स्टार हॉटेलात सिलिंग फॅन नसतात. त्याचं कारणही खास असल्याचं आढळून आलं आहे.
कदाचित तुम्हाला हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे. पंख्यांचं मेंटेनन्स अधिक असतं. पंख्याची मोटर जळते, पाते खराब होतात, पाते तुटतात आणि इतर रिपेअरिंगच्या अनेक गोष्टी असतात. जर हॉटेलात सेंट्रल कुलिंग सिस्टीमच्या जागी स्वतंत्र कुलिंग सिस्टिम असेल तर पंखे सुरूच राहतील. त्यामुळे पंख्यांची मोटर जळण्याची शक्यता अधिक बळावते.


