चिखली काँग्रेस व राहुल बोंद्रे हेच मनुस्मृतीचे खरे लाभार्थी… भाई विजय गवई..
मनुस्मृतीला विरोध करण्याचे ढोंग रचणारे ढोंगी सुद्धा…
मनुस्मृति मध्ये प्रामुख्याने जन्म आधारित श्रेष्ठता मान्य केली आहे आणि भारताचे संविधान प्रत्येक नागरिकाला समानता, समान संधी व समान अधिकार देते. माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्याकडे स्वर्गीय तात्यासाहेब बोंद्रे यांचा वारसा सोडल्यास दुसरे काय आहे? म्हणजे मनुस्मृतीमध्ये असलेली जन्म आधारित श्रेष्ठता( म्हणजे स्वर्गीय तात्यासाहेब बोंद्रे यांच्या अतिशय सधन व राजकीय,सामाजिक दृष्ट्या सजग कुटुंबात जन्म) सोडल्यास राहुल बोंद्रे यांच्याकडे स्वतःची अशी कोणतीही पुण्याई नाही. मग मनुस्मृतीचे खरे लाभार्थी राहुल बोंद्रेच नाहीत का ? असा खडा सवालच भाई विजय गवई यांनी आपल्या सर्व समाज बांधवांना केला आहे. पुढे बोलताना भाई विजय गवई म्हणाले, की…
मनुस्मृति सर्वांना समान अधिकार व समान संधी नाकारते, या आधारावर मनुस्मृतीला विरोध करणारे राहुल बोंद्रे यांनी बोंद्रे या आडनावा शिवाय इतर कोणालाही अधिकार व संधी कधीच दिल्या नाहीत! नरेंद्र खेडेकर यांना संधी नाकारणारे, प्राचार्य निलेश गावंडे यांना संधी नाकारणारे, प्रा.गवई यांना समान अधिकार नाकारणारे राहुल बोंद्रे यांनी तोंडाने मनुस्मृति विरोध करायचा व मनुस्मृती आचरणात आणायची हेच धोरण ठेवलेले आहे आता खरं सांगा मनुस्मृतीचे खरे लाभार्थी राहुल बोंद्रेच नाहीत का?
शिक्षण, संपत्ती राजकीय सहभाग आणि उपासनेचा अधिकार सर्वांसाठी समान नाही म्हणून मनुस्मृतीचा विरोध करणारे काँग्रेस आणि राहुल बोन्द्रे यांनी खरोखर यापैकी एकही अधिकार आपल्यासारख्या कुण्या दलिताला दिल्याचे एक तरी उदाहरण पाहायला मिळते का? शिक्षणाचा अधिकार सर्वांना समान सोडा शिक्षणाचा अधिकार तरी यांनी सगळ्यांना ठेवलाय का? यांचे पुत्र दिल्ली ला अमेरिकेला शिकतात, आणि यांच्या स्वतः च्या संस्थेमध्ये, कॉलेजमध्ये ज्या गरिबांची लेकरे शिकतात त्यांच्यासाठी तुटपुंज्या मानधनावर सगळीकडे वापरता येतील अशी प्राध्यापक कम कार्यकर्ता मंडळी ठेवून गरिबांच्या लेकरांची व त्यांच्या शिक्षणाची थट्टा मांडायची ही पद्धत बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोणी सुरू केली?
एकीकडे न्यायव्यवस्थेवर आपला प्रचंड विश्वास आहे असे भासवायचे आणि दुसरीकडे सत्तेत असताना अधिकाऱ्यांवर हात घालायचे, आपला एखादा शब्द मान्य न करणाऱ्या किंवा आपल्याला थोडासाही विरोध करणाऱ्या आपल्याच कार्यकर्त्याला भर रस्त्यात त्याच्या लेकरासमोर मारत न्यायचे. म्हणजे संविधानातील समान दंड, समान कायदा आपणच नाकारायचा आणि वर मनुस्मृतीला नावे ठेवत राहायची.
ही दुतोंड्या सापासारखी नीती काँग्रेस आणि काँग्रेसची पिलावळे स्वातंत्र्यापासून करत आली आहे. स्त्री दास्य किंवा स्त्री दमन करते म्हणून मनुस्मृतीला विरोध करायचा पण तरीही चिखलीच्या काँग्रेस मधून आजपर्यंत एकही सक्षम स्त्री नेतृत्व का उभे राहिले नाही? याचाही विचार करणे गरजेचे आहे.
त्यामुळे राहुल बोंद्रे हे आता संदेश आंबेडकर यांना बराचसा बाबासाहेबांसारखा लुक देऊन तुमच्या आमच्यात का फिरवत आहेत? हे आपण बहुजनांनी लक्षात घेतली पाहिजे आम्हाला बाबासाहेबांसारखा लूक देऊन फसवणारा नको तर बाबासाहेबांचे विचार देऊन सक्षम करणारा नेता हवा आहे. यासाठी समाजातील सर्व सुशिक्षित नवयुवकांनी एकत्र येऊन काँग्रेसच्या या षडयंत्राला उघड पाडले पाहिजे आणि आपल्या समाजाचा वापर,समाजाला सक्षम करणाऱ्यांसाठी होईल याची काळजी घेतली पाहिजे…


