मराठा उमेदवार नाकारणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराच्या पोस्टरवर सगळे मराठा नेत्यांचे फोटो..
मराठा समाजातील उमेदवाराला नगराध्यक्ष पद मिळवणे किंवा नगर अध्यक्षपदाची उमेदवारी मिळू नये म्हणून सगळे बोंद्रे एकत्र आले व त्यांनी मराठा समाजाचे लोकप्रिय असलेले प्राचार्य निलेश गावंडे यांचा काँग्रेस मधून नगराध्यक्ष पदासाठी असलेला पत्ता कट केला.
आता काँग्रेसचे उमेदवार असलेले श्री काशिनाथ बोंद्रे यांच्या उमेदवारीची पोस्टर बॅनर लावताना त्यांनी बॅनर वर माजी कॅबिनेट मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, माजी आमदार रेखाताई खेडेकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नरेंद्र खेडेकर, माजी आमदार धृपदराव सावळे यांचे फोटो लावलेले दिसून येत आहेत.
म्हणजे प्रत्यक्षात मराठा द्वेष करायचा मराठा समाजातील कोणतेही नेतृत्व पुढे येऊ द्यायचे नाही आणि मतांचा जोगवा मागण्यासाठी मराठा नेत्यांचे फोटोंचे प्रदर्शन करायचे हे सूत्र जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी सुरू केले आहे.
रेखाताई खेडेकर रनिंग आमदार असताना त्यांचे तिकीट कापावे म्हणून चिखलीतील उच्च पदस्थांना बैठकी घेऊन विनंती करणारे राहुल बोन्द्रे, ज्या धृपदराव सावळे यांच्या मुलीला जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सतत पाडण्यात ज्यांचा प्रमुख हातभार आहे ते राहुल बोंद्रे ,ज्या नरेंद्र खेडेकर यांना राहुल बोंद्रे यांनी कधीच आमदारकीचे तिकीटही भेटू दिले नाही, त्याच राहुल बोंद्रेंनी प्राचार्य निलेश गावंडे हे संपूर्णपणे लायक असतानाही मराठा समाजाचा द्वेष म्हणून त्यांना काँग्रेसचे तिकीट भेटू दिले नाही.
ते राहुल बोंद्रे विधानसभा निवडणुकीतही हे मराठा समाजाचे नेते आपल्या प्रत्येक मंचावर घेऊन बसले होते. म्हणजे आपल्या राजकीय फायद्यासाठी मराठा समाजातील नेतृत्व करणारे सर्व जुने एकत्र करून मंचकावर बसवायचे त्यांचे फोटो लावायचे आणि मराठा समाजाला हक्क देण्याची वेळ आली की त्यांचा हक्क हिरावून घ्यायचा आणी त्यांचा हक्क डावलायचा हे राहुल बोंद्रे यांना चांगल्या प्रकारे जमते. परंतु हे राहुल बोंद्रे फक्त राजकीय कारणासाठी आपला वापर करून घेत आहेत हे मराठा समाजातील नेत्यांना कळत नाही का? हा प्रश्न निर्माण होत आहे.


