4.1 C
New York
Tuesday, December 2, 2025

Buy now

भाजपने भ्रष्टाचारी नगराध्यक्षाला हाकलून दिले… बिनचेहऱ्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष… देवेंद्र फडणवीस

भाजपने भ्रष्टाचारी नगराध्यक्षाला हाकलून दिले... बिनचेहऱ्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष... देवेंद्र फडणवीस चिखलीमध्ये दीर्घकाळ सत्ता भोगलेल्या 'बोन्द्रे' कुटुंबाने समाजाची, समाजातील सामान्य वर्गाची व गरीबांची कधी चिंता केली...
spot_img

एक फुल, दोन माळी…!चिखलीत भेटेल का दोन माळी समाजातील उमेदवारा मध्ये लढत पहायला…

एक फुल, दोन माळी…!चिखलीत भेटेल का दोन माळी समाजातील उमेदवारा मध्ये लढत पहायला…

माळी समाजाच्या बगीच्यातील ‘राजकीय फुल’ कोणते?

चीखली शहराच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे — “एक फुल, दोन माळी!”…आगामी नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळी समाजातील दोन बलाढ्य व्यक्ती — दीपक देशमाने आणि दीपक खरात — या दोघांमध्येच खरी शर्यत असल्याचं दिसून येत आहे.एकीकडे काँग्रेसमधील जुना खेळाडू दीपक देशमाने, तर दुसरीकडे भाजपामध्ये नव्याने बहरणारे दीपक खरात.दोघेही आर्थिक दृष्ट्या सक्षम, समाजात प्रभावी आणि राजकीय आकांक्षांनी भरलेले…

दीपक देशमाने हे एकेकाळी माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे सर्वाधिक विश्वासू म्हणून ओळखले जात.राहुल बोंद्रे यांच्या सत्ताकाळात देशमाने यांचीसुद्धा प्रचंड भरभराट झाली होती.मात्र गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमधील पराभवानंतर बोंद्रे यांचे राजकीय अस्तित्व बरेच कमी झाले, आणि त्यामुळे देशमाने यांची गॉडफादरशिपही हरवली.सध्या देशमाने यांनी मुंबईत जाऊन “साहेबांची भेट घेतली” अशी चर्चा असून, काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाचे तिकीट त्यांना मिळेल का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.राहुल बोंद्रे हे “आपल्यापेक्षा वरचढ होणाऱ्या कोणालाही पदावर बसू देत नाहीत” अशी चर्चा असल्याने, देशमाने यांना पुन्हा ‘हाताखाली’ ठेवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुसरीकडे, माळी समाजातील दुसरे नेतृत्व दीपक खरात यांच्या रूपाने आता भाजपात सक्रिय झाले आहे.काही महिन्यांपूर्वीच त्यांनी आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला.खरात यांची आर्थिक सुबत्ता, समाजातील चांगली पकड आणि सत्ताधारी पक्षाची थेट साथ या गोष्टी त्यांच्या बाजूने आहेत.भाजपकडून त्यांना नगराध्यक्षपदाचे तिकीट मिळाले, तर त्यांच्या बगिच्यातील फुल उमलण्यास वेळ लागणार नाही.आमदार श्वेता महाले पाटील यांच्या विश्वासाचा लाभ मिळाल्यास दीपक खरात हे देखील सक्षम उमेदवार आहेत, पण त्यांचे नुकतेच काँग्रेस मधून भाजपात येणे आणि नवीन उमेदवाराला एकदम मोठी संधी देणे हे भाजपाचे धोरण नसल्याने त्यांच्या उमेदवारीबद्दल जरा संशय आहे…

काही वर्षांपूर्वी नगराध्यक्षपदासाठी आणखी “एका खरात” यांचेही नाव घेतले जात होते.मात्र मागील काही वर्षांत त्यांचा राजकीय आलेख प्रचंड खाली आला आहे.त्यांच्या मानस पालकांना ‘भुज’बळ दाखवता न आल्याने जेलवारी झाली आणी यांचीही ‘समता’ यांना त्याच दिशेने घेऊन जात असल्याचे दिसून येत असल्याने ‘दत्त’क खरात सोशल मीडियावर व्यक्त व्हायला सुरु झाले पण सोशल मीडियावरील “काहीही बोलायचं टाईप” भाषेमुळे त्यांना आता फारसे सिरियस घेतले जात नाही, तसेच “दहा-पंधरा वर्षांपूर्वी हे खरात आपल्या पक्षात आले पाहिजे असं जे पक्ष म्हणायचे ते पक्ष आणी सर्वच पक्षातील लोक त्यांना लांबूनच “रामराम ” घालताना स्पष्टपणे दिसून येते…

अशा प्रकारे माळी समाजाने चिखलीच्या प्रगतीमध्ये नेहमी हातभार लावला असतांना आता चिखलीच्या प्रगतीचे दोर माळी समाजाच्या हाती द्यायला चिखली तयार आहे का?

Related Articles

ताज्या बातम्या