कलगीतुरा पाहण्याची सवय झालेल्या चिखलीकरांची निराशा…
काँग्रेसची पोस्टारफाड मॅरेथॉन नंतर झालेल्या भाजप युवा मोर्चाच्या मॅरेथॉनला अभूतपूर्व प्रतिसाद…
बुलडाणा (प्रतिनिधी) :
काही दिवसांपूर्वी काँग्रेसने समाजात वोट पेरण्यासाठी एक मॅरेथॉन आयोजित केली होती. या कार्यक्रमाच्या दिवशीच मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने शेतकऱ्यांची जिल्हा बँक बुडवणाऱ्या नेत्याविरोधात पोस्टरबाजी केली होती. यावेळी एका नेत्याने, ज्याची हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती – मात्र ती छोटी की मोठी याबद्दल त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनाही माहिती नाही – अशा व्यक्तीने “पोस्टर फाडण्यात” नंबर एक मिळवला. त्या घटनेनंतर काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने “आम्हीही भाजपाच्या आगामी कार्यक्रमांमध्ये असेच विरोध करू” अशी धमकी दिली होती.
मात्र, काल भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा बुलडाणा यांच्या वतीने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसली. या स्पर्धेत पोस्टरफाडीपेक्षा दहापट गर्दी झाली, पण कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. यशस्वी आयोजनामुळे सहभागी धावपटूंपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वत्र समाधानाचे वातावरण होते.
दरम्यान, पोस्टर फाडीच्या प्रकरणावर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे काँग्रेस नेतृत्व घाबरून घरात चुपचाप बसले. शिवाय, गर्दीचे गणित मोजण्यासाठी पाठवलेल्या काँग्रेसच्या लोकांनी भाजप युवा मोर्चाच्या मॅरेथॉनला मिळालेला प्रतिसाद पाहून आपला विचार बदलल्याचे दिसून आले.
अखेरीस, काँग्रेसची मॅरेथॉन सपशेल अपयशी ठरली, तर भाजप युवा मोर्चाची मॅरेथॉन केवळ यशस्वीच नव्हे तर काँग्रेसच्या तोंडावर जोरदार उत्तर ठरली. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने केवळ उत्तम आयोजनच केले नाही तर समाजातील सकारात्मक वातावरण निर्माण करून जनतेचा विश्वासही जिंकला.


