6.8 C
New York
Wednesday, January 14, 2026

Buy now

राहुल बोन्द्रे यांचे चुकले काय?फरक नितीचा की नियतीचा?.. भाग 3

राहुल बोन्द्रे यांचे चुकले काय?फरक नितीचा की नियतीचा?.. भाग 3 एकीकडे कागदावरची सूतगिरणी, दुसरीकडे प्रत्यक्ष उत्पादनाचा कारखाना.. चिखली विधानसभा मतदारसंघात उभारण्यात आलेल्या दोन सहकारी सूतगिरण्या आज...
spot_img

चिखली मतदारसंघ सुंदर बनविण्याची गोष्ट:भाग २ (ग्रामीण विभाग)

*चिखली मतदारसंघ सुंदर बनविण्याची गोष्ट:भाग २ (ग्रामीण विभाग)*

प्रत्येक घरातील स्री जेंव्हा एखाद घर सांभाळते त्यावेळेस ती काही फक्त स्वयंपाकघर तेवढचं नीटनेटकं आणि स्वच्छ ठेवत नाही… किंवा फक्त घराची बैठक खोली तेवढी स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवत नाही तर…ती सगळं घर… घराच्या अंगापासुन ते घराच्या ओसरीपर्यंत सगळं काही स्वच्छ आणि सुंदर ठेवते…

त्यामुळे जेंव्हा चिखली मतदार संघ सुंदर बनिण्याची गोष्ट २०१९ला सुरू झाली.तेंव्हा एक रणरागिणी स्री कि, जी घरही सांभाळते आणि घरासारखा मतदारसंघही सांभाळण्याची कुवत ठेवते.अशा आमदार श्वेताताई महाले पाटील निवडुन आल्यामुळे चालू झाली…तर ती गोष्ट फक्त चिखली शहरापुरती मर्यादित नव्हती…तर त्या गोष्टीमध्ये चिखली मतदार संघातील ग्रामीण भागही समाविष्ट होतो.

तर सुरुवात होते खेड्यातील जागतीक समस्या….शेतातुन जाणारे पांदण रस्ते…या समस्येमुळे ग्रामीण भागात खुप अशांततेचे वातावरण असते… आणि आमदार श्वेताताईंनी हे हेरले जर ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर अगोदर तिथे शांतता लागेल आणि ग्रामीण भागात हि शांतता पांदण रस्त्यांची समस्या सोडवुनच होईल…तर आमदार श्वेताताईंनी ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेऊन पांदण रस्त्यांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत… आणि आजपर्यंत ११ कामे पूर्ण केलीत,१६५ कामे चालू आहेत आणि ६१५ कामे मंजूर आहेत.आणि ईथेही फक्त मोठ्या गावांचा विचार न करता अगदी छोट्यात छोट्या खेड्यांचाही विचार करण्यात आला.

उदाहरणादाखल,मुंगसरी गाव,२०११ जनगणनेनुसार गावची लोकसंख्या सुमारे ७१९ आहे.या गावातील लोकांना पांदण रस्त्यांची समस्या होती.पण आज जर या गावामध्ये आपण गेलात तर गावातील पांदण रस्ते तर झालेच पण त्या रस्त्यांचे डांबरीकरणही झालेत.आणि आज गावातील गावकरी शेतकरी समाधानाने आणि निश्चिंतपध्दतीने कमी वेळात शेतात जातपण आहेत आणि त्रासाविना शेतातील माल घरी किंवा बाजारपेठेत पाठवतपण आहेत.आणि गावातील काही शेतकरी तर पांदण रस्ता पक्का आणि डांबरीकरण झाल्यामुळे आता शेतीला जोडधंद्याची जोड देण्याचा विचार करत आहेत… गावातील फक्त एक समस्या सोडविली तर गावात शांतता तर आलीच पण गावकऱ्यांच्या मनामध्ये समृध्दीचे विचार येऊन गावाचा विकास होण्याचीही सुरूवात झाली…आणि हे फक्त माननीय आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील यांच्या विचार, संकल्पना आणि दृष्टीकोनातुन घडवून आणले…

त्यानंतर प्रत्येक गावात देऊळ किंवा मंदीर किंवा आप-आपली प्रार्थना स्थाने आहेत.आणि त्या मंदिरांच्या किंवा प्रार्थना स्थानांच्या सभामंडपाचा विषय येतो.कारण शेतकरी वर्ग संध्याकाळी दमुन भागुन आला कि, मन रमविण्यास एकत्रित पध्दतीने देव-ईश्वराची पुजा- अर्चना किंवा भजन करतो आणि त्यासाठी त्याठिकाणी एकत्रित येण्यासाठी एक व्यवस्थित जागा किंवा निवारा हवा असतो..मग सुरू झाली मोहीम…मागेल त्या प्रार्थनास्थळ किंवा मंदिराला सभामंडप देण्याची… आतापर्यंत १८० सभामंडपांसाठी १४ कोटी २० लक्ष रुपये राज्य सरकारकडुन मिळविले…

उदाहरणार्थ गांगलगावचे महादेव मंदिर; २०११ जनगणनेनुसार गावची लोकसंख्या २०१८.या गावामध्ये स्व.नारायण सावळे आणि गावकरी यांच्या पुढाकारातून फार पूर्वी महादेव मंदिर बांधण्यात आले.आणि श्रावण महिन्यामध्ये या मंदिरामध्ये पोथीचे पाठ घेण्याची परंपरा आहे.पण २०१९ पर्यंत मंदिराला पत्र्याचा सभामंडप होता.आणि आपल्याला माहीत आहे पावसाळ्यामध्ये पत्रे गळतात आणि त्यामुळे हे पाठ घ्यायला अडचण यायची.पण जेंव्हा गावकऱ्यांनी समाभंडपाची मागणी केली.ती मंजूर करून;आज जर तुम्ही महादेवाच्या दर्शनासाठी गेलात तर तुम्हाला तिथे पक्का असा सिमेंटचा समाभंडप दिसेल…. आणि आज तो पक्का सभामंडप दिसतोय…तो फक्त आमदार श्वेता ताई महाले पाटील यांच्या सहकार्यामुळे…हर हर महादेव…

त्यानंतर देवाच्या भक्तीसोबत ग्रामीण तरुणांच्या शरीराचाही विकास व्हावा या ताईंच्या विचारातुन गावोगावात व्यायामशाळा सुरू करण्यात आल्यात… आतापर्यंत २२ व्यायामशाळांसाठी २ कोटींचा निधी मंजुर करुन घेण्यात आलेला आहे…तसेच व्यायाम फक्त बंदिस्त खोलीपुरता बंदिस्त न ठेवता तो मोकळ्या वातावरणात सगळ्यांसाठी खुला असावा यासाठी खुल्या व्यायामशाळा सुरू करण्यात आल्यात…याचा प्रत्यय म्हणून मतदार संघात फेरफटका मारतांना बऱ्याच ठिकाणी तुम्हाला खुल्या व्यायामशाळा दिसतील…

उदाहरणार्थ चिखली-बुलढाणा रस्त्यावरील हातणी गावाच्या माथ्यावरची व्यायामशाळा…यालाच म्हणतात गावचा सर्वांगीण विचार आणि विकास… आणि हे फक्त आणि फक्त आमदार श्वेता ताई महाले पाटीलांच्या सुक्ष्म दृष्टीकोनामुळे…

एखाद्या गावाची प्रसिद्धी किंवा नाव हे त्या गावच्या देवस्थान आणि यात्रा आणि जत्रेतुन होत असते…हे हेरून,जर त्या गावातील तीर्थक्षेत्राचा विकास करायचा असेल तर, त्यासाठी कायम स्वरुपी निधीची सोय लागते…मग यासाठी मागील तीन वर्षात जवळपास २० धार्मिक स्थळांना महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून ‘क’ दर्जा प्राप्त करून दिला.

जेंव्हा एखाद्या संस्थानला ‘क’ दर्जा प्राप्त होतो.त्यावेळेस शासनाकडुन एक कोटी रूपयांपर्यंत रक्कम तिर्थक्षेत्र विकास कामांसाठी मिळु शकते किंवा मिळते.आणि आतापर्यंत त्या तिर्थक्षेत्रांना १ कोटी ८२ लक्ष रुपयांपर्यंत निधी मिळवुन दिला…

तसेच तालुक्यातील एकलारा येथील स्व.किसनदेव संस्थानला शासनाकडे पाठपुरावा करून”ब” दर्जा प्राप्त करून दिला… एखाद्या संस्थानला “ब” दर्जा मिळाल्यानंतर त्या संस्थानला शासनाकडुन जवळपास २ कोटी रुपये निधी हा विकास कामांसाठी मिळतो…आणि यालाच म्हणतात शाश्वत विकास… आणि हा दृष्टिकोन फक्त आमदार श्वेता ताई महाले पाटीलच ठेवु शकतात…

अजुन एक छोटीशी गोष्ट…पण महत्त्वाची….बऱ्याच गावांना फाटा असतो.आणि बऱ्याच वेळा मायमाऊलींना आणि शेतकरी बंधुंना प्रवासासाठी यावरती ताटकळत उभे रहावे लागते… आणि ऊन-वारा-पाऊसामध्ये बराच त्रास होतो… ताईंनी हि एक समस्या ओळखून,आज जर तुम्ही मतदार संघातील फाट्याचे गावे बघितली तर जवळपास सर्व ठीकाणी तुम्हाला सुंदर असे बस थांबे दिसतील कि ज्यामुळे सामान्य शेतकरी बंधुचा आणि माय-माऊल्यांचा ताटकळत उभं राहण्याचा त्रास कमी करुन…एक सुखद आणि सुंदर अशी सोय उपलब्ध करून दिली…आणि अशा पध्दतीने जनतेची छोट्यात छोटी समस्या ओळखून त्यावरती उपाय आणि समाधान फक्त आणि फक्त आपल्या माननीय रणरागिणी पण तितक्याच संवेदनशील मनाच्या आमदार सौ.श्वेताताई महाले पाटीलच करू शकतात…

तर आमदार सौ.श्वेता ताईंच्या नजरेतुन, गावाकडील सुंदर विकासाची हि तर काही उदाहरणे आहेत.अशाच प्रकारची असंख्य अशा सुंदर आणि शाश्वत विकास कामाची यादी आहे.ती पुर्ण इथे मांडता येणार नाही…

पण हा सुंदर आणि शाश्वत विकास अखंड,अविरत आणि सातत्याने सुरू ठेवायचा असेल तर, आमदार श्वेता ताई महाले पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही.तर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिनांक २० नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा कमळ चिन्हावरती उभ्या भाजपा उमेदवार रणरागिणी माननीय आमदार सौ.श्वेताताई विद्याधरजी महाले पाटील यांना बटन क्रमांक “४” दाबुन प्रचंड मतांनी विजयी करा…

आपलाच,
*@ पार्वतीनंदन चि.प्रा गणेश काशिनाथ बाहेकर…

Related Articles

ताज्या बातम्या