तुमचे प्रत्येक मत मला विकासासाठी बळ देणारे ठरेल – आ. श्वेताताई महाले
जनतेची सेवा व आपल्या परिसराचा विकास करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी राजकारणात प्रवेश केला. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने पाच वर्षांपूर्वी चिखली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्याच्या विधानसभेत करण्याची मला संधी मिळाली. या तुमच्या उपकाराचे ऋण जास्तीतजास्त विकासकार्याच्या माध्यमातून फेडण्याचा मी प्रयत्न केला.
आपल्या आमदार पदाच्या कार्यकाळात कधीही जात, धर्म आणि पक्षाचा भेद मानला नाही. आपली समस्या घेऊन आलेल्या कोणत्याही जाती – धर्माच्या व पक्षाच्या नागरिकाला व कार्यकर्त्याला न्याय देण्याचाच नेहमी प्रयत्न केला.
परिसरात कोट्यावधी रुपयांचा विकास निधी खेचून आणत प्रत्येक गावामध्ये मूलभूत सुविधा निर्माण केल्या. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला, रस्ते, वीज आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या. याशिवाय ठीकठिकाणी सभामंडप, सामाजिक भावने, ग्रामपंचायत भवनाची निर्मिती करून उल्लेखनीय कार्य केले. तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांची देखील प्रभावीपणे अंमलबजावणी केली.
आमच्या प्रयत्नाला आणखी प्रोत्साहन मिळावे याकरिता पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. अजून बरीच कामे चिखली मतदारसंघात व परिसरात करावयाची आहेत; त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ मला नितांत गरजेची असून तुमच्या प्रत्येकाचे मत मला विकासकार्यासाठी बळ देणारे ठरेल; म्हणून पुन्हा एकवार मला आपल्या सेवेची संधी द्या असे आवाहन यावेळी आ. श्वेताताई महाले यांनी केले.


