मेहकरची जनता आपल्या “पिढीला” काय बनवू इच्छिते?
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर व विरोधक यांचेकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत.मेहकर विधानसभा मतदारसंघांमध्ये यावेळी परिवर्तनाचे वारे जोरात वाहु लागले आहेत.मेहकर विधानसभा मतदारसंघात उच्चशिक्षित, अनुभवसंपन्न, सुसंस्कृत चेहरा म्हणून सिद्धार्थ खरात यांना खूप जास्त प्रसिद्धी व पसंती मिळत आहे.
झेंड्याचा रंग महत्त्वाचा आहेच पण त्यापेक्षाही पुढच्या पिढीला योग्य मार्गदर्शन व शिक्षण व विकास याची पायवाट देणारा लोकप्रतिनिधी मेहकर विधानसभा मतदारसंघाला भेटणार की नाही? हा मोठा प्रश्न आहे.
आपल्या प्रशासनिक आयुष्यात एक उत्तम प्रशासक राहिलेले सिद्धार्थ खरात यांनी आपले कौटुंबिक आयुष्यही तेवढ्याच ताकदीने पेलले आहे हे दिसून येते.
सिद्धार्थ खरात यांची मुलगी के ई एम सारख्या प्रतिष्ठीत महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेली असून,श्री सिद्धार्थ खरात यांचा मुलगा हा देखील पुणे येथील डी. वाय. पाटील. वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
आता मेहकर विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ जनतेने आपल्या मुलांना सिद्धार्थ खरात यांच्या मुलांसारखे कर्तृत्ववान बनवायचे? की जन्मभर दुसऱ्याचा झेंडा खांद्यावर घेऊन मारामाऱ्या करणारा कार्यकर्ता बनवायचे याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
मेहकर विधानसभा मतदारसंघातील जनतेला आपले फुटके नशीब उजळवण्याचा हा मोठा चान्स आला आहे.पुन्हा त्याच लोकप्रतिनिधींना मत देऊन आपल्या मुलांना झुंडशाहीच्या, गुंडगिरीच्या मार्गात उतरवायचे की त्यांना शिक्षणाचे,विकासाचे नवीन रस्ते दाखवायचे हे मेहकरची सुज्ञ जनता नक्कीच ठरवेल.


