महाविकास आघाडीने जारी केली लोकसेवेची पंचसूत्री…
शेतकरी,युवक व माता भगिनी यांचा विकास हेच प्रथम कर्तव्य..राहुलभाऊ बोन्द्रे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यात विकासाची व लोकसेवेची पंचसूत्री जाहीर केली आहे.महायुतीच्या जाहीरनाम्यापेक्षा महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये मतदारांना प्रभावित करण्यासाठी महिला,मुली,युवक,शेतकरी व जातीय आरक्षण यांचा उल्लेख करण्यात आला आहे.खालील प्रमाणे आहे महाविकास आघाडीची पंचसूत्री
1) महालक्ष्मी या योजनेअंतर्गत महिला व मुलींना मोफत बस प्रवास तसेच, महिलांना दर महिन्याला रुपये तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे
2) कुटुंब रक्षणाकरता प्रती कुटुंबाला रुपये 25 लाखापर्यंत असा मोफत विमा प्रदान करण्यात आला असून मोफत औषधांची ही व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.
3) महाविकास आघाडी तर्फे जातीनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन देण्यात आले असून.आरक्षण मर्यादेत 50% पेक्षा वर नेण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील असेही आश्वासन देण्यात आलेले आहे.
4) शेतकऱ्यांना रुपये तीन लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असल्याचे व कर्ज फेडीस प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
5) बेरोजगार युवकांना दर महिन्याला रुपये चार हजार पर्यंत मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले


