भय आणी भ्रष्टाचारविरोधातील लढाईसाठी तुमचा आशीर्वाद द्या…राहुल बोन्द्रे
आज महाराष्ट्रातील शेतकरी वाईट परिस्थितीत आहे.प्राण पणाला लावून पिकवलेल्या मालाला नैसर्गिक संकटापासून वाचवले, पण सुलतानी संकट असलेल्या सरकारने सोयाबीन आणी कापूस यांना सोडून इतर सर्व गोष्टीचे भाव वाढवले आहेत.त्यामुळे अशा दुहेरी संकटात सापडलेल्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी,सामान्य जनता, कष्टकरी, म्हणून, शेतमजूर या प्रत्येकाच्या न्याय हक्कासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे.
या सरकारने पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात टाकले पण तीन हजार रुपये पेक्षा जास्त रक्कम दर महिन्याला भावांच्या खात्यातून काढून घेतली आहे.सगळ्या मालावर यांनी जीएसटी लावला पण शेतकऱ्याच्या मालाला कधी यांनी भाव दिला नाही.कुठल्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगाराला यांनी कधी पगारवाढ दिली नाही.त्यामुळे अशा भ्रष्ट सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे.चिखली सकट संपूर्ण महाराष्ट्रातून भय आणि भ्रष्टाचार मुक्त वातावरणासाठी या सरकारला हद्दपार करा.
बाबासाहेबांच्या संविधानामध्ये प्रचंड प्रमाणात मोडतोड करून बहुजनाचा आवाज बंद करणारे आणी रोहित वेमूला सारखे बहूजन विद्यार्थी शिकून पुढे जाण्याचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांना प्रचंड त्रास देऊन फाशी घ्यायला लावणाऱ्या या भ्रष्ट आणी बहुजनद्रोही सरकारला धडा शिकवण्याकरिता आणी संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कायम प्रयत्नशील असेल.
सगळ्या भय,भ्रष्टाचाराने पीडित आणी महागाई व हुकूमशाहीने त्रासलेल्या बहुजनाचा आवाज म्हणून 20 नोव्हेंबर 2024 ला विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मत देऊन आपले शुभ आशीर्वाद द्यावे..असे आवाहन माजी आमदार राहुल बोन्द्रे यांनी केले आहे.


