3.4 C
New York
Wednesday, December 3, 2025

Buy now

भाजपने भ्रष्टाचारी नगराध्यक्षाला हाकलून दिले… बिनचेहऱ्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष… देवेंद्र फडणवीस

भाजपने भ्रष्टाचारी नगराध्यक्षाला हाकलून दिले... बिनचेहऱ्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष... देवेंद्र फडणवीस चिखलीमध्ये दीर्घकाळ सत्ता भोगलेल्या 'बोन्द्रे' कुटुंबाने समाजाची, समाजातील सामान्य वर्गाची व गरीबांची कधी चिंता केली...
spot_img

प्रत्येकाच्या न्याय हक्कासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे.भय आणी भ्रष्टाचारविरोधातील लढाईसाठी तुमचा आशीर्वाद द्या…सिद्धार्थ खरात

प्रत्येकाच्या न्याय हक्कासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे.भय आणी भ्रष्टाचारविरोधातील लढाईसाठी तुमचा आशीर्वाद द्या…सिद्धार्थ खरात

आज महाराष्ट्रातील शेतकरी वाईट परिस्थितीत आहे.अस्मानी आणि सुलतानी या दोन्ही संकटांनी शेतकऱ्यांची दैना झाली आहे.शेतापर्यंत जाण्यासाठी योग्य रस्ते नाहीत,त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या मालाचे व शेतकऱ्यांच्या जनावराचे प्रचंड नुकसान होत आहे.एवढा त्रास सहन करूनही पिकवलेल्या मालाला, सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला अशी.

प्राण पणाला लावून पिकवलेल्या मालाला नैसर्गिक संकटापासून वाचवले, पण सुलतानी संकट असलेल्या सरकारने सोयाबीन आणी कापूस यांना सोडून इतर सर्व गोष्टीचे भाव वाढवले आहेत.त्यामुळे अशा दुहेरी संकटात सापडलेल्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी,सामान्य जनता, कष्टकरी, म्हणून, शेतमजूर या प्रत्येकाच्या न्याय हक्कासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे.

सगळ्या भय,भ्रष्टाचाराने पीडित आणी महागाई व हुकूमशाहीने त्रासलेल्या बहुजनाचा आवाज म्हणून उबाठा शिवसेना पक्षातर्फे मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहे.तरी शेतकरी व कष्टकऱ्यांचा आवाज बनण्यासाठी आपल्या मधून आलेल्या एका शेतकऱ्याच्या पोराला आज सहकार्य करून माझे बाहू बळकट करा असे आवाहन माजी सनदी अधिकारी तथा महाविकास आघाडीचे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या