सिद्धार्थ खरात यांना वाढता पाठिंबा पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरत आहे….श्री सुबोध सावजी.
राज्याचे माजी राज्य महसूल मंत्री व अकोला वाशिम जिल्ह्याचे पूर्व पालकमंत्री श्री सुबोध सावजी यांनी एका व्हिडिओमध्ये बोलताना सिद्धार्थ खरात यांना मिळत असलेला वाढता पाठिंबा पाहता विरोधकांना त्यांची भीती वाटत असून त्यामुळेच विरोधक चुकीच्या बातम्या पसरवत असल्याचे सांगितले.
कुणाला किती पाठिंबा आहे? कुणासाठी किती लोक आले? यावरून त्या उमेदवाराच्या निवडणुकीतील विजय किंवा पराजय याचा आराखडा बांधता येतो.आणी सिद्धार्थ खरात यांना समाजाच्या सर्व स्तरातून मिळणारा वाढता पाठिंबा पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू निसटत असल्याचे दिसून येत असल्याचे लक्षात येत असल्याचे ते म्हणाले.
मेहकर येथे सिद्धार्थ खरात यांनी घेतलेल्या सभेला सत्ताधारी पक्षांनी घेतलेल्या सभेपेक्षा दीडपट लोक जास्त आल्याचे श्री सावजी म्हणाले. देऊळगाव साकर्षा, हिरडवं,आणी लोणार येथे झालेले सिद्धार्थ खरात यांचे कार्यक्रम खूप मोठे आणी प्रचंड पाठिंबा दर्शवणारे होते त्याची धास्ती घेतल्यानेच विरोधक सिद्धार्थ खरात यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे श्री सुबोध सावजी म्हणाले.


