1.2 C
New York
Saturday, January 17, 2026

Buy now

राहुल बोन्द्रे यांचे चुकले काय?फरक नितीचा की नियतीचा?.. भाग 3

राहुल बोन्द्रे यांचे चुकले काय?फरक नितीचा की नियतीचा?.. भाग 3 एकीकडे कागदावरची सूतगिरणी, दुसरीकडे प्रत्यक्ष उत्पादनाचा कारखाना.. चिखली विधानसभा मतदारसंघात उभारण्यात आलेल्या दोन सहकारी सूतगिरण्या आज...
spot_img

राहुल बोन्द्रे यांनी आम्हा “भूमिहीनामध्ये” त्यांनी शपथपत्रात दाखवलेली जमीन वाटून द्यावी….भाई शंकर चव्हाण

राहुल बोन्द्रे यांनी आम्हा “भूमिहीनामध्ये” त्यांनी शपथपत्रात दाखवलेली जमीन वाटून द्यावी….भाई शंकर शेषराव चव्हाण

माजी आमदार राहुल बोंद्रे यांना खोटे बोलण्याचे व्यसन जडले असून मतदारांना प्रभावित करण्याच्या प्रयत्नात ते जास्तीत जास्त खोट्या बाबी समाजात पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत.

चिखली शहराचे राजपुत्र असलेले राहुल सिद्धिविनायक बोंद्रे यांनी काल उमेदवारी अर्ज भरताना भाजप सरकारने त्यांना भूमिहीन केल्याचे निखालस खोटे वक्तव्य केले. ज्याप्रमाणे व्यंग निर्माण करण्यासाठी त्यांनी हे खोटे वक्तव्य केले त्यातून त्यांची गरिब विरोधाची मानसिकता दिसून येते.त्यांनी म्हटल्याप्रमाणे ते जर भूमीहिन आहेत तर निवडणूक आयोगाला त्यांनी दिलेल्या अफेडेव्हिटमध्ये करोडो रुपयाची जी संपत्ती त्यांनी दाखवली आहे. जी जमीन त्यांनी दाखवली आहे ती आमच्यासारख्या अनुसूचित जातीतील भूमिहीन गरिबांना वाटून द्यावी! कदाचित ती जमीन आमचीच असेल आणि चुकीने तुमच्या शपथपत्रात दिसत असेल! असा शाब्दिक हल्ला चिखली विधानसभा मतदारसंघातील बसपाचे उमेदवार शंकर चव्हाण यांनी काँग्रेसचे उमेदवार राहुल बोन्द्रे यांच्यावर केला आहे.

राहुल बोन्द्रे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे आपण अनुयायी असल्याचे आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करावे.उगीच आपल्या राजकीय फायद्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणी खोटे बोलून,आमच्यातीलच काही समजद्रोह्यांना हाताशी धरून राज्य करायचे हे कुठपर्यंत सुरु ठेवणार? असा प्रश्नच भाई शंकर चव्हाण यांनी मांडला

आमच्या पोरांचा कॉलेजमध्ये फी साठी छळ करायचा. त्यांच्या स्कॉलरशिप त्यांना द्यायच्या नाहीत आणी आमच्या मतांसाठी स्वतः भूमिहीन असल्याचे सांगायचे. भूमिहीन असल्याच्या यातना काय असतात त्या या राजपुत्राला काय कळणार? भूमिहीनांचा एवढा कळवळा खरंच येत असेल तर भूमी हिनांच्या मुलाला राहुल भाऊंनी आपल्या सगळ्या कॉलेजमध्ये शिक्षण मोफत करायला हवे! पण हे तसे करणार नाहीत कारण यांचा कळवळा फक्त आमची मते घेण्यापुरतं असतो ना!अशा कडक शब्दात भाई शंकर चव्हाण यांनी राहुल बोंद्रे यांचा खरपूस समाचार घेतला.

Related Articles

ताज्या बातम्या