केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2019 ला सुरु करण्यात आली होती. त्या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर एका वर्षात 6 हजार रुपये पाठवले जातात. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते. महाराष्ट्रात महायुतीचे डबल इंजिन सरकार स्थापन झाल्यानंतर “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना राबवली जाते.
महाराष्ट्र सरकारनं “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना सुरु करून बळीराजाच्या प्रती सरकारची सन्मानाची भूमिका विषद केली आहे. ही योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धरतीवर सुरु करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आराखडा तयार केला होता व त्याच आराखड्याच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी महासन्मान योजना तयार करण्यात आली.
योजनेतून महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये पाठवले जातात. महाराष्ट्र सरकारनं नमो शेतकरी महासन्मान योजनेतून जवळजवळ 92 लाख शेतकरी कुटुंबांना आत्तापर्यंत अंदाजे रु. 7000 कोटी लाभ वितरित करण्यात आला आहे. महायुतीचे सरकार शेतकऱ्याप्रती प्रचंड संवेदनशील असून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची प्रत्येक रक्कम वितरित करण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून केला जात आहे.विदर्भातील शेतकऱ्यां प्रति प्रचंड काळजी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी विशेष आग्रही होते.त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच खरी शेतकरी नेते असल्याचे आमदार श्वेताताई महालेे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हजार रुपये
केंद्र सरकारप्रमाणं महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना सुरु केलेली आहे. त्यामुळं पीएम किसान सन्मान योजनेचे 6 हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 6 हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत


