9.6 C
New York
Wednesday, January 14, 2026

Buy now

राहुल बोन्द्रे यांचे चुकले काय?फरक नितीचा की नियतीचा?.. भाग 3

राहुल बोन्द्रे यांचे चुकले काय?फरक नितीचा की नियतीचा?.. भाग 3 एकीकडे कागदावरची सूतगिरणी, दुसरीकडे प्रत्यक्ष उत्पादनाचा कारखाना.. चिखली विधानसभा मतदारसंघात उभारण्यात आलेल्या दोन सहकारी सूतगिरण्या आज...
spot_img

देशातल्या 30 राज्यांपैकी कोकणातल्या या गावाला मिळाला सर्वोत्कृष्ट कृषी-पर्यटन पुरस्कार

शाश्वत पर्यटनाला चालना देण्याच्या आणि स्थानिक पर्यावरण-संस्कृती जतन करण्याच्या गावाच्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार दिला जातो. त्यात रत्नागिरीतल्या कर्दे गावाने बाजी मारली आहे.देशातल्या 30 राज्यांतील 991 गावांपैकी रत्नागिरीतील कर्दे गावाने सर्वोत्कृष्ट कृषी-पर्यटन पुरस्कार पटकावला आहे.

स्वच्छ समुद्रकिनारे, नयनरम्य परिसर, पांढरी वाळू यामुळे कर्दे गाव पर्यटकांचं विशेष आकर्षण आहे.

हा प्रतिष्ठित पुरस्कार भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त जाहीर केला आहे. गावाने नैसर्गिक संसाधनांचा वापर, जल व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन यांसह विविध उपक्रम राबवले आहेत. त्यामुळेच कर्दे गावाची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

या यशामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्वच्छ समुद्रकिनारे आणि शांत परिसरासाठी ओळखले जाणाऱ्या या गावात शाश्वत पर्यटन आणि महिला सक्षमीकरणासाठी केलेले पर्यावरणपूरक प्रयत्न हे खरोखर गावाचे वेगळेपण सिद्ध करतात.

कृषी-पर्यटनाला चालना देण्यापासून ते स्मार्ट वॉटर आणि कचरा व्यवस्थापनापर्यंत अतिशय सुनियोजित गोष्टी येथे पाहायला मिळतात. राज्यात सहलीचं नियोजन करताना कर्दे गावाला भेट देण्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच समृद्ध करेल.

ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाकडून दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. या स्पर्धेत देशातील 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 991 गावे सहभागी झाली होती.

Related Articles

ताज्या बातम्या