काजोल सध्या ‘दो पट्टी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये ती एका पोलिस महिलेची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काजोल कपिल शर्माच्या शोमध्ये या चित्रपटाच्या स्टार कास्टसोबत हजेरी लावणार असून त्याचा प्रोमोही आला आहे.
काजोलने पोलिसाची भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि तिचा पती अजय देवगण अनेकदा पोलिस बनला आहे, त्यामुळे कपिलने तिला विचारले की, या भूमिकेसाठी तिने अजय देवगणकडून काही टिप्स घेतल्या आहेत का? या प्रश्नावर काजोलने अतिशय मजेशीर उत्तर दिले आहे.
प्रोमो व्हिडिओमध्ये कपिल काजोलला विचारतो की, तिने पोलीस बनताना अजय देवगणकडून काही टिप्स घेतल्या आहेत का? यावर काजोलने लगेच उत्तर दिले, “मी अजिबात विचारले नाही, कारण मी त्याला सिंघमचे पूर्ण प्रशिक्षण दिले आहे. विसरलात?” अजय देवगणने ‘सिंघम’च्या प्रत्येक भागात पोलिसाची भूमिका साकारली आहे आणि लवकरच तो सिंघम अगेनमध्येही दिसणार आहे.


